ALL CATEGORIES
TOTAL 2426 PRODUCTS
Site Navigation

सम्राट अशोक चरित्र

150.00 Original price was: ₹150.00.129.00Current price is: ₹129.00.

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages:  176
  • Binding: Paperback
  • Weight : 160 Gm
  • कालखंड : इ.स.पूर्व ३०४ ते इ. स. पूर्व २३२
  • राज्यकाळ : इ. स. पूर्व २७२ ते इ. स. पूर्व २३२
  • जगाच्या इतिहासात देवनामप्रिय धर्मनायक/धम्मनायक चक्रवर्ती सम्राट अशोकाचं नाव आजही नेपोलियन आणि पीटर द ग्रेट सारख्या सम्राटांच्याहून वर घेतलं जातं. अशोकाचा राज्यविस्तार हा जंबुद्वीप [आजचा भारत] नेपाळ, पाकीस्तान, अफगाणिस्तान, भुटान, बांगलादेश, इरान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान या प्रदेशांपर्यंत व्याप्त होता. यावरून लक्षात येतं की अशोक दिग्विजय होता!! पण इतिहासकार राम पुणीयानी म्हणतात कोणत्याही सम्राटाची महानता त्याच्यामध्ये विराजमान असलेल्या न्यायप्रवनता, सत्यधर्मपरायणता, आणि प्रजाहीतदक्षतेवरून होते. आणि अशोक यामुळेच धुळीतून उठून धुरंधरांच्या श्रेणीत अग्रक्रमांकावर विराजमान आहे. कलिंगविजयानंतर आणि कलिंग युद्धात झालेल्या हिंसाचाराने विरघळून गेलेल्या या भूपतिने बौद्ध धम्म दिक्षा घेतलीच सोबत शीलसदाचार आचरणात आणून तो प्रजेपर्यंत देखील पोहोचवला. अशोकाची विशेतः म्हणजे त्याने शीलसंपन्नतेतून राष्ट्रौन्नतीचा पाया घातला! धर्म आणि नातीचं शिक्षण तर त्याने जनतेत पौहोचवलंच सोबतच नालंदा विद्यापीठ स्थापून उच्चशिक्षणाची सोय देखील केली होती. पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ, संस्कृत वाङ्मय, वेदविद्या, वैद्यक, न्याय, मीमांसा, तंत्रशास्त्र, अर्थशास्त्र सारखी शास्त्र त्याकाळी तक्षशिला आणि नालंदा विद्यापीठात शिकवली जात! अशोकाची राज्यनीती कौटील्याच्या अर्थनीतीवर आधारलेली होती. एवढा मोठा राज्यविस्तार असुनही त्याचं प्रजेकडे बारकाईने लक्ष होतं. शांती-समता प्रस्थापित करण्यासाठी त्याने ठिक ठिकाणी बौद्ध भिक्खू आणि शिलालेख कोरले! सर्वधर्म सहिष्णुता ही अशोकाची विशेषता होती याची माहिती देखील या पुस्तकात तुम्हाला मिळेल! तो दिग्विजय तर होताच पण स्वतःत आणि प्रजेत सत्यधर्माचं बीज पेरून त्याने आत्मविजय देखील केला होता. व्हींसेंट ए स्मिथ सारखे इतिहासकार अशोकाचं चक्रवर्तित्व गौरविताना थकत नाहीत. अख्खा जम्बुद्वीपात त्याने सत् धम्माचा प्रसार केला होता! सोबत श्रीलंका हे देखील त्याच्या मुली आणि मुलामुळे बौद्धमय झालं! सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रथम बुद्धशासन काळ हा अशोकाने सुरू केला आणि त्यानंतर १९५५ साली दुसरा बुद्ध शासनकाळ सुरू झाला आणि त्याच्या एकाच वर्षानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि भारतात बुद्धाचं पुणर्जागरण केलं! वासुदेव आपटे म्हणतात “प्राचीन जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट व शासक होऊन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांत सापडतात परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबत साशंकता आहे. असं म्हणतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले व शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले. त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही!” पण दुर्दैवाने आपण भारतीय लोकंच या महान सम्राटांला विसरून गेले आहेत. आपल्याकडे इतके संकुचित आणि बुद्धीदरीद्री लोक आहोत की सम्राट अशोकांकडे सुद्धा ते बौद्ध धर्मिय सम्राट याच दृष्टीने बघतो!! असो हे पुस्तक तुम्हाला प्रियदर्शी देवांचे प्रिय सम्राट अशोकांची तोंड ओळख करून देईल !
  • – राज जाधव

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “सम्राट अशोक चरित्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Recently Viewed Products

8%
धम्मचक्र प्रवर्तनाय
Add to Wishlist
Add to Wishlist

धम्मचक्र प्रवर्तनाय

1 in stock
Original price was: ₹150.00.Current price is: ₹139.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
38%
अंधश्रद्धा व बुवाबाजी
Add to Wishlist
Add to Wishlist

अंधश्रद्धा व बुवाबाजी

Out of stock
Original price was: ₹80.00.Current price is: ₹50.00.
Add to Wishlist
Add to Wishlist
Shopping Cart