ALL CATEGORIES
TOTAL 2413 PRODUCTS
Site Navigation

कोंडवाडा

90.00 81.00

Out of stock
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist

Description

  • Language: मराठी
  • Pages: 60
  • Binding: Paperback
  • माणूस म्हणजे त्याचा समाज. हजारो वर्षे हा माणूस चिरेबंद व चिणलेला जगला. त्याच्या मस्तकात एक भीषण तत्त्वज्ञान होतं, बाहूंमध्ये अत्याचार अन् दमणयंत्रणा. त्याचं धड संपत्तीची असुरी लालसा अन् पाय शरणागतता व अंधकार. दीडदोनशे वर्षांपूर्वी यंत्रानी निर्माण केलेल्या विक्रयवस्तूंचे कुलपी गोळे तटबंदीवर थडकले. अंतर्बाह्य विस्कट सुरू झाली. अंधकाराच्या पाळामुळांपर्यंत एकेक विजेचे लोळ पोचले. वरपासून खालपर्यंत सर्वदूर हत्यारं खणाणली. ठिणग्या उडू लागल्या आजही उडतायत अन् उडतील. अजून माणूस बांधलेला आहे, अमानुष आहे. या विस्कटण्यामध्ये सांस्कृतिक वीणसुद्धा विस्कटली. धागे धागे सुटत गेले. गुंतत गेले, तुटू लागले. आणि आज गेल्या पाचदहा वर्षांत हे सगळं जमिनीतून वर उगवतंय. दलितांचं, श्रमिकांचं, क्रांतीचं साहित्य जन्माला येतंय. या कोलाहलात एक नोंदण्याजोगा आवाज दयाचा. स्पष्ट पण न एकारलेला. साध्या वस्त्रांमधला पण भरजरी माती ल्यायलेला. राजवाड्याच्या खंदकातून अन् रेल्वेच्या खडखडाटातून उमललेला आणि तारे खुडण्यासाठी शस्त्रं परजणारा.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कोंडवाडा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart

Subtotal: 135.00

View cartCheckout

कमीत कमी 150.00 किंवा अधिक किमतीची ऑर्डर स्वीकारली जाईल. तुमची सध्याची ऑर्डर एकूण 135.00 आहे.
You must have an order with a minimum of 150.00 or more to place your order, your current order total is 135.00.