दृश्यांचा ढोबळ समुद्र

दृश्यांचा ढोबळ समुद्र

  • Language: मराठी
  • Pages:
  • Binding: Paperback
  • मराठीतले श्रेष्ठ कादंबरीकार आणि कवी भालचंद्र नेमाडे यांनी ह्या संग्रहाविषयी काढलेले गौरवोद्गार : सद्यःस्थितीत मराठीत उत्तम कवी वाढताहेत पण उत्तम कविता मात्र वाढत नाही, अशा कष्टदशेत प्रज्ञा दया पवार यांच्या ‘दृश्यांचा ढोबळ समुद्र’ ह्या संग्रहातल्या कविता नवी अंतर्दृष्टी देणाऱ्या वाटल्या. आपला वारसा पुढे नेणारी ही कवयित्री सामाजिक पिंड आणि लिहिणारा पिंड यांच्यातला विलक्षण संघर्ष जवळ जवळ प्रत्येक अंगाच्या प्रतिमांनी मांडताना दिसते. ह्यातली कुठलीही कविता दलित कविता म्हणवून घेत नाही. खैरलांजीवरची दीर्घ कवितासुद्धा एक स्त्री म्हणून, एक नागरिक म्हणून जाणवलेली आहे. ‘मला माझ्यासारखाच राहू दे’ असा घोर पर्याय सांगणारी ही थेरिगाथा वाचकालाही सोडवता येऊ नये असे गूढ प्रश्न टाकणारी आहे. विचारधारांच्या गढूळण्याने मनाचा तळ दिसू नये, अशी चलाखी संपण्याची चिन्हे या कवितेत आहेत. घोषणाबाज आविष्कारांपेक्षा ह्या कवितेला अधिक खोलवरच्या व्याकूळ होणाऱ्या स्रोतांचा भक्कम पुरवठा आहे. निऋतीचा अभिमान बाळगल्यामुळे या कवयित्रीचे शब्द नेहमी भिजलेले वाटतात. आपल्यातल्याच आणखी एका बाईचे सदैव भान ठेवणारी ही कवयित्री ‘वेसवा’, ‘बाजारबसवी’ अशा शब्दांना गळ्यातले हार समजून मिरवते. घेतला वसा टाकून आपल्या शरीरातला भरगच्च तपशील ह्या कवितेने स्वतःत ठासून भरल्यामुळे हा संग्रह सर्वांगाने आपल्याला भिडतो.

180.00

Out of stock