Subtotal: ₹1,205.00
समाजक्रांती आणि साहित्य
₹200.00 Original price was: ₹200.00.₹180.00Current price is: ₹180.00.
1 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 210
- Binding: Paperback
- डॉ. यशवंत मनोहर यांची महाराष्ट्राला ओळख आहे ती कोणत्याही पातळीवरची वैचारिक तडजोड न करणारा इहवादी कवी, समीक्षक आणि विचारवंत म्हणून. लेखणीबरोबरच वक्तृत्वाची देणगीही त्यांना लाभलेली आहे. समीक्षा आणि वैचारिक साहित्य या दोन्ही विश्वांना हादरे देणारे नवे काही तरी त्यांना सतत स्फुरत असते. ‘समाजक्रांती आणि साहित्य’ हे पुस्तक म्हणजे त्यांची काही भाषणे आणि मुलाखती यांचा संग्रह. साहित्य आणि समाज यांचे नाते अतूट असे आहे. या नात्याचा मनोहरांनी घेतलेला नेमका वेध या पुस्तकातून सामोरा येतो आणि वाचणार्याला विचार करायला लावतो. आंबेडकरवादी साहित्यापुढील आव्हाने; बदलते वास्तव आणि साहित्यनिमिर्ती; क्रांतीची गरज : एकच एक महाअस्मिता; परिवर्तनवादी साहित्याची बीजाक्षरे; बौद्धांची राजकीय संस्कृती; तुफानातील दिव्यांचे ध्येय -अशी या पुस्तकातील काही लेखांची शीर्षकेच कोणत्याही विचार करणार्या वाचकाला हे पुस्तक हातात घ्यायला लावणारी आहेत. भोवतीच्या माणसांची विचारप्रक्रिया थांबते, तिथून डॉ. मनोहरांचा विचार सुरू होतो, याची साक्ष या संग्रहावरून येते.
Reviews
There are no reviews yet.