वोल्गा ते गंगा

-7%

वोल्गा ते गंगा

  • Language: मराठी
  • Pages: 296
  • Binding: Paperback

मानव समाज आज जिथे आहे, तेथपर्यंत तो अगदी प्रारंभीच पोचलेला नव्हता; आजचा टप्पा गाठण्यासाठी त्याला मोठमोठया संघर्षांना तोंड द्यावे लागले. मानव समाजाच्या प्रगतीचे तात्त्विक विवेचन मी माझ्या 'मानव-समाज ' या ग्रंथात केलेले आहेच. या प्रगतीचे यथार्थ सरळ चित्रण देखील करता येण्यासारखे आहे. याच उद्देशाने मी 'वोल्गा ते गंगा ' लिहिण्यास उद्युक्त झालो. मी या ग्रंथात हिंदी-युरोपीय जातीविषयीच तेवढे लिहिण्याचे ठरविले; हेतु हा की, भारतीय वाचकांना ग्रंथ समजण्यास सुगम व्हावा. मिसरदेशीय, असीरियन व सिन्धु जाती या प्रगतीच्या दृष्टीने, हिंदी-युरोपीय जातीच्या मानाने हजारो वर्षे अगोदरच किती तरी पुढे गेलेल्या होत्या. पण त्या सगळ्यांचा अंतर्भाव या वर्णनात केला असता तर लेखक व वाचक या दोघांच्याही अडचणी वाढल्या असत्या. मी हरएक काळातील समाजाचे चित्रण प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण अशा प्रकारचा प्रयत्न हा पहिलाच असल्यामुळे यात चुका होणे साहजिक आहे. जर या माझ्या प्रयत्नामुळे भावी काळातील लेखकांना अधिक बिनचूक चित्रण करण्यास मदत झाली तर मी स्वतःला कृतार्थ समजेन.

ख्रिस्तपूर्व ६००० ते इ.स. १९२२ पर्यंतच्या मानव समाजाच्या प्रगतीचे ऐतिहासिक, आर्थिक व राजकीय वस्तुस्थितीच्या आधारे केलेले हे ललितकथांच्या स्वरूपातील संपूर्ण चित्रण 'वोल्गा ते गंगा'.

325.00

1 in stock