प्रबोधनमधील प्रबोधनकार खंड २

प्रबोधनमधील प्रबोधनकार खंड २

  • Language: मराठी
  • Pages: 492
  • Binding: Hardbound
  • या खंडांचं वाचकांच्या द‍ृष्टीनं मोल काय आहे, तेही थोडक्यात सांगता येईल. एक तर महाराष्ट्राच्या इतिहासाची महत्त्वाची बाजू जी एरव्ही मुख्य प्रवाहात येत नाही, ती समजून घेण्यासाठी हे खंड वाचण्याची गरज आहे. दुसरा मुद्दा की, 1920 ते 1930 हे दशक महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं एक केऑस आहे. नेतृत्वाच्या द‍ृष्टीनं महाराष्ट्र या काळात चाचपडत होता. कारण, दोन महत्त्वाचे नेते एक राष्ट्रवादी लोकांचे नेते लोकमान्य टिळक आणि ब्राह्मणेतर पक्षाची बाजू लढवणारे शाहू महाराज दशकाच्या सुरुवातीलाच कालवश झाले होते. त्यामुळं त्यांच्या अनुयायांसमोर चांगला नेता नव्हता. या काळात प्रबोधनकार ठाकरे पुढं येऊन महाराष्ट्रासमोरची वैचारिक पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. याद‍ृष्टीनं या त्रिखंडात्मक ग्रंथाचं महत्त्व आहे. महाराष्ट्रातल्या बुद्धिप्रामाण्यवादाचा इतिहास समजून घेण्यासाठी हे प्रबोधनकारांचं या खंडात दडलेलं विचारधन वाचणं आवश्यक आहे. - डॉ. सदानंद मोरे

489.00

1 in stock