डॉ. आंबेडकर आणि चळवळीची अस्सल स्रोत साधने खंड १

-27%

डॉ. आंबेडकर आणि चळवळीची अस्सल स्रोत साधने खंड १

  • Language: मराठी
  • Pages: 720
  • Binding: Paperback
  • या खंडामध्ये त्या वेळेच्या दैनिकातील (कालखंड १९२३ ते १९५६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या चळवळीशी संबंधित लेख आणि बातम्यांचे संकलन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्य आणि व्यक्तिगत आयुष्याच्या सर्व बातम्या (काही पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून तर काही खऱ्या आणि खोट्या) इंग्रजी वर्तमानपत्रात प्रकाशित होत असत. इंग्रजी वर्तमानपत्रात देशातील मोठ्या बातम्या, राजकीय, सामाजिक आणि स्वातंत्र्या संबंधी सोबतच आंतरराषट्रीय बातम्या प्रकाशित होत. साहजिकच अश्या इंग्रजी वर्तमान पत्रांकडे खूप बातम्या असल्यामुळे प्रत्येकच बातमी त्यात विस्ताराने येईलच याची शास्वती नसते. म्हणून काही बातम्या फार छोट्या येतात. परंतु महाराष्ट्रातील मराठी वर्तमानपत्रात अनेक बातम्या विस्ताराने प्रकाशित होत असत आणि विशेषतः डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची कर्मभूमी महाराष्ट्र असल्याने त्यांच्या कार्य आणि आंदोलनाशी निगडित बातम्या ह्या विस्ताराने येत असत. याच विस्तृत अश्या मराठी बातम्यांचे संकलन या ग्रंथात आहे.  प्रस्तुत संशोधनपर ग्रंथात फार महत्त्वाची अशी ऐतिहासिक माहिती मिळते. हा ग्रंथ प्रत्येक ग्रंथप्रेमी, संशोधक आणि ग्रंथ संग्रहकानी अवश्य हाताळावा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला समजून घेण्याकरिता हा ग्रंथ फार महत्वपूर्ण आहे.

399.00

2 in stock (can be backordered)