ALL CATEGORIES
TOTAL 2408 PRODUCTS
Site Navigation

तुकयाची आवली

Description

  • Language: मराठी
  • Pages: 188
  • Binding: Paperback
  • आवलीला त्या घटनेचा पुरता अर्थ कळला. ती विलक्षण चरकली. बुवांच्या टाळचिपळ्या बुवांशिवाय ? आवलीनं टाहो फोडला. धनी ऽ ऽ ऽ! धनी ऽऽऽऽ! आणि ती बुवांच्या बैठकीवर कोसळली. बुवा ज्यांना आपले श्वास आणि उच्छ्वास म्हणत होते, त्याच टाळचिपळ्या आज बुवांपासून वेगळ्या, अनाथ होऊन बुवांच्या बैठकीवर पडल्या होत्या. करपलेल्या काळजानं आणि चरकलेल्या मनानं त्या टाळचिपळ्या उराशी धरून आवली आकांत करत होती. तिचा आकांत सगळ्या गावकऱ्यांचं काळीज चिरत गेला. विठ्ठलाच्या मूर्तीचा थरकाप उडवत गेला. त्याच्या पायाखालची वीट थरारली. इंद्रायणी क्षणभर वाहायचं विसरली. विठ्ठल मंदिराच्या कळसाला छेदत आवलीचा टाहो आकाश फाडत गेला. नंतर कितीतरी वेळ त्याचे पडसाद आकाशातून येत राहिले. वाळवंटात कोसळत राहिले. विठ्ठलाच्या मंदिराच्या गाभाऱ्यावर आदळत राहिले.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “तुकयाची आवली”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.