No products in the cart.
धम्मपद गाथा आणि कथा भाग ६
₹390.00 Original price was: ₹390.00.₹351.00Current price is: ₹351.00.
4 in stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 330+24
- Binding: Hardbound
- “धम्मपद” तथागतांच्या धम्माचे सार ज्यात सामावले आहे असा हा देदीप्यमान असा महान व लोकप्रिय ग्रंथ ! धम्मपद गाथा आणि कथा हा ग्रंथ त्रिपीटकातील सुत्तपिटकातील खुद्दकनिकायातील दुसरा ग्रंथ आहे. बौद्ध धम्माचे महान आचार्य बुद्धघोषांनी “धम्मपद अठ्ठकथा” या ग्रंथाची निर्मिती केली आहे. धम्मपदाचा जगभरातील सर्वच प्रमुख भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या ग्रंथातील अनेक गाथांचा वापर आपल्या “बुद्ध आणि त्यांचा धम्म” या ग्रंथात देखील केला आहे. माणसाने धार्मिक जीवन शील सदाचाराणे कसं जगावं याची कला आणि दिशा दाखवणारा ग्रंथ म्हणजे धम्मपद गाथा आणि कथा.
- या ग्रंथांत एकूण २६ वर्ग म्हणजेच अध्याय असून ४२३ तथागतांच्या अमृतमुखातून निघालेल्या गाथांचे संकलन करण्यात आलं आहे. सोबत कोणती गाथा कोणत्या प्रसंगी तथागतांनी म्हटली आहे ती घटना कथास्वरुपात असल्याने माणसाला धम्माचा खोल बोध होण्यास मदत होते. हा ग्रंथ जितका अध्ययन कराल तितका दरवेळी जीवनाचे नवे आणि खोल विस्तृत अर्थ काढतो. या ग्रंथांतून शील, समाधी, प्रज्ञा, निर्वाण व तथागतांच्या सनातन धम्माचा अष्टांगिक मार्ग देखील समजायला मदत होते. काही बौद्ध देशांमध्ये नवख्या भिक्खूची उपसंपदा होण्यासाठी त्याला धम्मपदातील गाथा मुखोद्गत करणं आवश्यक असतं.
- धम्मपदाचा इंग्रजी अनुवाद करणारे लेखक अल्बर्ट जे. एडमंड म्हणतात, “आशिया खंडात जर कोणत्या अविनाशी ग्रंथांची निर्मिती झाली असेल तर तो धम्मपद आहे.” याच ग्रंथाबाबत भारतातील महान बौद्ध आचार्य भदंत आनंद कौसल्यायन सांगतात की “एक पुस्तक को केवल एक पुस्तक को जीवनभर साथी बनाने की यदि कभी आपकी इच्छा हुई, तो विश्व के पुस्तकालयोंमें “धम्मपद” से बढकर दुसरी पुस्तक मिलना कठीण है।”
- सदर ग्रंथ हा श्रीलंकेतील भिक्खू वेरागोडा सारद महाथेरो यांनी इंग्रजी भाषेत सचित्र उपलब्ध करून दिला आहे, आणि याच ग्रंथाचा मराठी भावानुवाद श्री. डी. एल. कांबळे यांनी मराठीत करून थोर उपकार केले आहेत. सदर ग्रंथ हा मराठीत एकूण सात खंडात विभागला गेला आहे व ग्रंथ Hardbound रचनेचा आहे. बालक, तरुण आणि वयस्कांपांसून सर्वांना समजण्यासारखा हा ग्रंथ आहे. आज तरुण सत्यधर्मापासून अलग होताना दिसतात त्यांच्यासाठी हा ग्रंथ जीवनातील दुःख नाहीसे करण्यास नक्कीच दिशादर्शक ठरेल व मनात सत्याचं बीज पेरेल. हिंदू धर्मात भगवद्गीता, इस्लाममध्ये कुर-आन आणि ख्रिस्ती धर्मात जे स्थान बायबलचं आहे तेच स्थान बौद्ध धम्मात “धम्मपदाचं” आहे.
- – राज जाधव
Reviews
There are no reviews yet.