ALL CATEGORIES
TOTAL 2755 PRODUCTS
Site Navigation

Description

  • Language: मराठी
  • Pages: 634
  • Binding: Hardbound
  • चार दशकांपूर्वी म्हणजे १९७२ साली संपूर्ण मराठी साहित्याला एक फार मोठया वादळाने खळबळ उडवून दिली. ते वादळ म्हणजे नामदेव ढसाळ . हे वादळ शमले तर नाहीच; पण ‘दलित पँथर ‘ या लढाऊ संघटनेची स्थापना करून मरगळलेल्या आणि अन्यायाने पिडलेल्या दलित समाजाला एक संजीवनी दिली. मराठी साहित्यात आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नामदेव ढसाळांनी जे महत्वपूर्ण योगदान दिले आहे ते केवळ अजोड आहेच, पण पुढल्या अनेक पिढयांना अभ्यासपूर्ण ठरेल असे ‘माईलस्टोन’ लिखाण त्यांच्या ज्वलंत लेखणीने केले. त्यांचे सर्व काही समष्टीसाठी व इतर राजकीय, सामाजिक, लेख म्हणजे विद्यार्थी कार्यकर्ते यांच्यासाठी दीपस्तंभाप्रमाणे प्रकाशमार्ग ठरतील इतके व्यासंगी दस्तऐवज आहेत. प्रत्येक राजकीय घटना मग ती महाराष्ट्रातील असो वा देशातील वा परदेशातील-माफिया असो अगर आंतरराष्ट्रीय चळवळ लेखक नामदेव ढसाळांची विलक्षण आक्रमक लेखणी सर्व जगातल्या प्रत्येक घटनेची नोंद घेत त्याबद्दल परखड टीकाटिप्पणी करत होती. नाजूक अलवार मराठी भाषेला वाकवत त्यांनी नवी पोलादी भाषा तयार केली. अस्सल मातीतले दुःख आणि खडकभाषा गावकुसातली मराठी कवितेत सहज आणली. पण ते करतानाच एकीकडे डॉ बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक दीर्घकाव्य लिहून त्या महामानवांप्रती आपली निष्ठा, श्रद्धा, भक्ती व्यक्त केलीच; पण त्याचबरोबर हळुवार शृंगारिक अशी गाणीही लिहिली! त्यांचा राजकीय व्यासंग-सकारात्मक स्पष्ट भूमिका यामुळे त्यांचे लेखन इतके अभ्यासपूर्ण आहे की, भारताचेच काय एकूणात पूर्ण जगभरातले राजकारण, समाजकारण,आपल्या लक्षात येते इतके हे महत्वाचे दोन्ही खंड आहेत.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “समग्र नामदेव ढसाळ खंड १”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.