भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया

-10%

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्त्रिया

  • Language: मराठी
  • Pages: 380
  • Binding: Paperback
  • Weight: 500 Gm
  • स्वातंत्र्य संग्रामातील कार्य हा बहुसंख्य स्त्रियांच्या दृष्टीने त्यांच्या परंपरागत कार्याचा थोडाफार विस्तार होता. तरीही फार थोड्या साहसी स्त्रियांनी परंपरा झुगारून त्यांच्या परंपरागत आणि दुय्यम दर्जाविरुद्ध बंड पुकारले, आणि स्त्रीवादी व राष्ट्रवादी भूमिकांचे एकत्रीकरण केले. कोणतेही पद किंवा सत्ता यांची अभिलाषा न धरता त्यांनी नि:स्वार्थपणे देशसेवा केली. राष्ट्रीय चळवळीला प्रथमच राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्वरूप प्राप्त झाले. परिणामी मोठ्या संख्येने स्थानिक व प्रादेशिक स्तरावर उत्साह दिसून आला. त्यामुळे प्रदेश, वर्ग, जाती, लिंग व धर्म यांचे अडसर भारतीय इतिहासात दीर्घ कालांतराने दूर झालेले दिसले. समानतेच्या तत्त्वज्ञानात, सामाजिक न्यायात, निधर्मीवादात आणि राष्ट्रवादात झिरपलेली पायाभूत भावनिष्ठा स्पष्ट झाली. स्वातंत्र्याचे अंतिम ध्येय गाठण्यासाठी ही भावनिष्ठा सर्वत्र हळूहळू झिरपून चळवळीला मार्गदर्शक ठरली.
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील स्त्रियांची भूमिका असा एक परिसंवाद मुंबईत डॉ. य. दि. फडके ह्यांच्या प्रामुख्यात झाला होता. ह्या परिसंवादात डॉ. फडके ह्यांच्या विवेचक बीजभाषणानंतर 'क्रांतीकारक स्त्रियांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान' व 'महात्मा गांधीबरोबर त्यांच्या विविध उपक्रमांत व चळवळीत कार्य करणार्‍या स्त्रियांची भूमिका आणि त्यांचा राष्ट्रीय चळवळीवरील परिणाम' अशा दोन विषयांवर अभ्यासकांनी जे निबंध वाचले त्या सार्‍यांचे तर हे पुस्तक आहेच त्याशिवाय 'अल्पसंख्याक स्त्रियांचे राष्ट्रीय चळवळीतील योगदान' व 'परदेशातील स्त्रियांचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग' असेही विशेष भाग ह्यात आले आहेत. ह्या सार्‍यांचे सुसंपादन करणार्‍या नवाझ ब मोदी ह्यांनी हे लेखन समजून देणारी विस्तृत प्रस्तावनाही लिहिली आहे- त्यांचा ह्या परिसंवादातही सहभाग होताच. पिछाडी यशस्वीपणे सांभाळणार्‍या येसूबाई सावरकरांसारख्यांच्यामुळेच आघाडीवर काही घडू शकले आहे ह्याचीही जाणीव येथे ठेवण्यात आली आहे.

270.00

1 in stock