फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट

-10%

फ्रीडम अ‍ॅट मिडनाईट

  • Language: मराठी
  • Pages: 408
  • Binding: Paperback
  • Weight: 375 Gm
  • `भारतावर राज्य करण्याची जबाबदारी ब्रिटिश वंशावर नियतीने कशी काय सोपवली हे एक अतक्र्य, अगम्य असे गूढच आहे.` —रुड्यार्ड किपलिंग `भारतातील ब्रिटिश सत्तेवर आपण आपल्याच हाताने उदक सोडत आहोत. आपण आपल्याच हाताने हा धोंडा पायावर पाडून घेत आहोत. त्यातून होणारी हानी आपल्या दृष्टीने अंतिम व आपल्या एकूण अस्तित्वाला धोक्यात आणणारीच ठरेल. यथावकाश, आपल्याला जगातील एक किरकोळ प्रतीची सत्ता बनवणा-या एका प्रक्रियेची ती सुरुवातच ठरणार यात मला तर शंका वाटत नाही.` — विन्स्टन चर्चिल हाऊस ऑफ कॉमन्स मधील एका भाषणात फेब्रुवारी१९३१ `नियतीशी आपण अनेक वर्षांपूर्वी एक करार केलेला होता. आज तो क्षण आला- आपल्या वचनबद्धतापूर्तीचा. त्या वेळी केलेली आपली ती प्रतिज्ञा आज पूर्ण होत आहे... आजच्या या दिवशी, जेव्हा घड्याळात मध्यरात्रीचा टोला पडेल, त्या वेळी जग झोपेत असेल एकीकडे पण आपल्या भारतात मात्र प्रत्येक जण एका नव्या जीवनाचा व स्वातंत्र्याचा अनुभव घेण्यासाठी जागा असेल. इतिहासात असा एखादा क्षण येतो, पण तोही क्वचितच! त्या क्षणी आपण `जुने जाऊ द्या मरणालागुनि` म्हणत एका नव्या वळणावर पदार्पण करतो. तो क्षण असतो एका युगान्ताचा, राष्ट्रात्म्याच्या जागृतीचा - ज्याचा आवाज सतत दाबून धरण्यात आलेला होता - हुंकार कानी पडण्याचा हा एक अलौकिक क्षण आहे.` —जवाहरलाल नेहरू १४ ऑगस्ट १९४७ च्या मध्यरात्री भारताच्या घटना समितीसमोर भाषण करताना
  • भारतीय लेखकाने नव्हे, इंग्लीशमननेही नाही तर फ्रेंच व अमेरिकन जोडगोळीने लिहिलेली भारतीय स्वातंत्र्याची रोचक कहाणी भारतीय स्वातंत्र्याच्या संपूर्ण लढ्याचा हा इतिहास नसून हा लढा भारतीय स्वातंत्र्याकडे कसा गेला, ह्या स्वातंत्र्याचा मुहूर्त कसा ठरला, त्यासाठी काय हालचाली झाल्या, काय उलथापालथी झाल्या व त्या कोणी कशा केल्यात ह्याचा छडा लावण्याचा हा विलक्षण वाचनीय प्रयत्न केवळ ऐकीव वा लिखीत माहितीवरच आधारलेला नव्हे तर संबंधित व्यक्तींना समक्ष भेटून त्याची शहानिशा लावणारा त्या ऐतिहासिक मध्यरात्रीपर्यंतच येऊन हे लेखन थांबलेले नाहीतर ह्या लढ्यातील सर्वार्थाने एक आगळेच व्यक्तिमत्त्व ठरलेल्या महात्मा गांधीच्या अखेरीपर्यंत येऊन ते थबकलेले आहे, त्याने वाचकांना दिढमूढ करून टाकलेले आहे. अनुवादही तितकाच उत्कंठावर्धक.

356.00

1 in stock