ALL CATEGORIES
TOTAL 2343 PRODUCTS
Site Navigation

राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा

Description

  • Language: मराठी
  • Pages: 118
  • Binding: Paperback
  • राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवनकार्यावरील हा लेखसंग्रह आहे. गेल्या दहा-बारा वर्षांत पाक्षिक लोकराज्य, साप्ताहिक सकाळ, दै. पुढारी, दै. सकाळ इत्यादी विविध नियतकालिकांच्या खास अंकांतून प्रसंगविशेषी प्रसिद्ध झालेले लेख आहेत. याशिवाय दोन लेख कोल्हापूरच्या भाई माधवराव बागल विद्यापीठाने आयोजित केलेल्या चर्चासत्रात सादर केलेले ‘शोधनिबंध’ आहेत. ‘ब्राह्मण ब्युरॉक्रसी’ व ‘क्षात्रजगद्गुरू’ या विषयांवरील लेख २००१ मध्ये आम्ही प्रकाशित केलेल्या ‘राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ’या ग्रंथातून घेतले आहेत. अखिल भारतीयांचा उद्धार करण्याचे व्रत घेतलेल्या या थोर पुरुषाचा तत्कालीन वरिष्ठ वर्णीयांच्या इंग्रजांविरुद्ध चालविलेल्या स्वराज्याच्या हक्काच्या चळवळीसंबंधीचा दृष्टिकोन काय होता, हे त्यावरून समजून येते. राजर्षी शाहू छत्रपतींचा लढा अशा दुसऱ्याला स्वातंत्र्याचे हक्क नाकारणा ऱ्या वर्णवर्चस्ववाद्यांविरुद्ध होता. इंग्रजांकडून राजकीय स्वातंत्र्याचे हक्क मागणारे लोक आपल्याच देशातील आपल्याच बांधवांना सामाजिक स्वातंत्र्याचे, सामाजिक न्यायाचे हक्क नाकारत होते. इतिहासाचे विकृतीकरण करणा ऱ्याना सत्येतिहासाचे सादरीकरण करूनच उत्तर देणे, हा सुसंस्कृत समाजाचा राजमार्ग मानला जातो. प्रस्तुत संग्रहातील कोल्हापूर गॅझेटिअरवरील लेख या मार्गावरील लेखकाच्या मतानुसार केलेली वाटचालच आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “राजर्षी शाहू छत्रपती एक मागोवा”

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
No products in the cart.