राजर्षी शाहू छत्रपती

-4%

राजर्षी शाहू छत्रपती

  • Language: मराठी
  • Pages: 648
  • Binding: Paperback
  • Weight : 800 Gm

धनंजय कीरांनी लिहीलेलं राजर्षी शाहू यांचं चरित्र एका परंपरागत राजा ते स्वकर्तृत्वाने महामानव "राजर्षी" बणलेल्या राजाच्या संघर्षमय प्रवासाचं थरारक वर्णन आहे. या चरित्रात प्रथमतः शाहुपूर्व महाराष्ट्र आणि सोबतच छत्रपतींच्या घराण्यातील राजकारणाचा थोडक्यात आढावा घेतला गेला आहे. सदर चरित्र ग्रंथात जन्म ते युगसमाप्ती पर्यंत अशी एकूण २८ प्रकरणे आहेत. ज्यावेळी कोल्हापूर म्हणजेच करवीर ची गादी डळमळलेल्या अवस्थेत त्यावेळी शाहुंना म्हणजेच यशवंत घाटगे यांना दत्तक घेणं हे तत्कालीन समाजक्रांती घ्या दिशेने टाकलेलं पाऊल म्हणावं लागेल. १८९० साली महात्मा फुलेंच्या निर्वाणानंतर समाजक्रांतीची सुत्रे राजर्षींनी आपल्या हाती घेतली हे निर्विवाद सत्य आहे. या चरित्रात टिळक आणि शाहू छत्रपती यांच्यातील वेदोक्त प्रकरणाचा संघर्ष विस्ताराने आला आहे. डॉ. नायर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे यांचं महत्त्व देखील सदर शाहू चरित्रात ठळकपणे दिसून येतं. एक लोकशाहीचा पुरस्कार्ता शासक जो शुद्र अतिशुद्र म्हणून वागणूक मिळालेल्या लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव करून देऊन "महारांचा राजा" ही ब्राह्मणी वर्गाने लावलेली बिरुदावली अभिमानाने मिरवतो हे वाचून भारवायला होतं. दारीद्र्याने गांजलेल्या आणि ब्राह्मणी वर्चस्वाने ग्रासलेल्या समाजाला वर काढण्याचा एका संस्थानिकाचा संघर्ष रोमांचित करणारा आहे आणि तो पद्मभूषण धनंजय कीरांनी जीवंत केला आहे.

- राज जाधव

625.00

1 in stock