महात्मा जोतीराव फुले

-6%

महात्मा जोतीराव फुले

  • Language: मराठी
  • Pages: 366
  • Binding: Paperback

"महात्मा जोतीराव फुले : आमच्या समाजक्रांतीचे जनक" या चरित्र ग्रंथात धनंजय कीरांनी ध्येयाचा साक्षात्कार झालेला महात्मा सजीव, साकारला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं चरित्र लिहीण्यादरम्यानच्या बाबासाहेबांच्या भेटीत, बाबासाहेबांनी तब्येतीमुळे आपल्याला महात्म्याचे चरित्र लिहीता येणं शक्य नाही असं कीरांना सांगितलं, त्यावर धनंजय कीरांनी "बाबासाहेब, आपण ते कार्य करू शकला नाहीत तर ते मी तडीस नेण्याचा प्रयत्न करेन!" असं सांगितले! आणि खरंच हे चरित्र वाचल्यावर लक्षात येतं की धनंजय कीरांनी ही जबाबदारी मोठ्या हिमतीने आणि जबरदस्त तर्कशुद्ध मांडणी करून पेलली आहे. सदर चरित्र ग्रंथात जन्म ते युगसमाप्तीपर्यंत अशी एकूण २१ प्रकरणे आहेत. या चरित्रात फुल्यांच्या जन्मापूर्वीची कुलकथा, फुल्यांच्या शिक्षणाचा काळ सोबतच शिक्षण घेण्यासाठी चाललेली छोट्या जोतीची धडपड आणि त्यातच झालेला सावित्रीबाईंसोबतच विवाह ह्या सर्व घटना सुरवातीच्या प्रकरणांत येतात. या चरित्राच्या मध्यान्हात जोतीराव आणि सावित्रीबाईंचा मुलींना शिकविण्यासाठीचा सामाजिक संघर्ष व त्यासोबतच कुटुंब कलहाला द्यावं लागलेलं तोंड ह्या घडणांचा आढावा घेतला आहे. निर्भिड आणि निर्भय होऊन ब्राह्मणी वर्चस्वाला थेट आव्हान देणाऱ्या जोतीरावांना मारण्यासाठीची दिलेली सुपारी आणि त्या प्रसंगाला फुल्यांनी मोठ्या धैर्याने आणि निर्भय होऊन दिलेलं तोंड हे थक्क करणारं आहे. सदर चरित्र ग्रंथात फुल्यांची महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत झालेला विधवा पुनर्विवाह या विषयावरचा वाद देखील पहायला मिळतो! फुले हे बोलके सुधारक कधीच नव्हते हे या विषयावरून‌ वाचकांच्या मनावर ठसतं. या चरित्रात आपल्याला, रावबहादूर नारायण मेघांनी लोखंडे, न्यायमूर्ती रानडे, बाळ गंगाधर टिळक, विष्णू शास्त्री चिपळूणकर, महाराज सयाजीराव गायकवाड अनेक तत्कालीन मंडळींची उपस्थिती पहायला मिळते. स्री शिक्षण चळवळ, सत्यशोधक समाजाची उभारणी, कामगार संघटना, जातीभेद नाकारून समतेचा पुरस्कार करणार्या आधुनिक भारताच्या प्रथम महात्म्याचा देदीप्यमान असा संघर्ष धनंजय कीरांनी या चरित्र यशस्वीपणे ग्रंथात उभा केला आहे.

- राज जाधव

425.00

1 in stock