No products in the cart.
डॉक्टर आंबेडकर
Description
- Language: मराठी
- Pages:
- Binding: Paperback
- डॉक्टर आंबेडकर हे तानाजी बाळाजी खरावतेकर यांनी १९४३ साली लिहिलेले आणि सन १९४६ मध्ये कराची येथून प्रकाशित झालेले एक मराठी चरित्रपुस्तक आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर लिहिलेले पहिले पुस्तक व आद्यचरित्र आहे.
- भारतापासून पाकिस्तानची फाळणी होण्यापूर्वी कराची बंदराच्या शहरामध्ये व्यापार-उदीमासह उदरनिर्वासाठी कोकणातून लेखक तानाजी खरावतेकर यांचे कुटुंबे कराचीमध्ये वास्तव्याला गेले होते. खरावतेकर हे मुंबई विद्यापीठाचे कोकणातील इतिहास विषय घेऊन कला शाखेचे डॉ. आंबेडकरानंतरचे पहिले पदवीधर होते. कराचीमध्ये वास्तव्यास राहून खरावतेकरांनी अभ्यासपूर्ण लेखन करुन ‘डॉ. आंबेडकर’ हे चरित्र लिहीले व कराची येथूनच प्रकाशित केले होते. या पुस्तकाची मूळ प्रत सध्या दुर्मिळ झाली असून, त्याचे मुंबई-कराची फ्रेंडशिप फोरम या व्यासपीठाअंतर्गत ऑब्झव्र्हर रिसर्च फाऊंडेशनने पुर्नमुद्रण केले आहे. प्रा. रमाकांत यादव व त्यांचे सहकारी रमेश हरळकर यांनी हे पुस्तक २०१० साली पुनर्प्रकाशित केले होते. त्यानंतर ते पुस्तक नव्या रूपात ऑब्झर्व्हर रिसर्च फाऊंडेशनचे सुधींद्र कुलकर्णी यांनी प्रकाशित केले. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती वर्षांचे औचित्य साधून त्याचे प्रकाशन मुंबईत विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते करण्यात आले.
Reviews
There are no reviews yet.