बाबासाहेब

-21%

बाबासाहेब

  • Language: मराठी
  • Pages: 120
  • Weight: 135 Gm
  • Binding: Paperback
  • 'बाबासाहेब ..... !' ही यशवंत मनोहर यांची विश्वत्त्वज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील महाकाविता ! 'आंबेडकर' हे निरंतर सर्जनशीलता, उदंड मानवी सन्मानशिलता आणि विज्ञानदृष्टीशीलता या उजेडमूल्यांच्या पायावर संपूर्णच विश्वाची पुनर्रचना करू शकणाऱ्या महाप्रक्ल्पाचे नाव आहे' आंबेडकर' या शब्दाचे लेखन दुनिया आता आमूलाग्र क्रांती, असीम प्रज्ञान, माणुसकीचे अथांग किंवा अनंत उजेडायन असेही करते.
  • 'आंबेडकर' हा आता पृथ्वीच्या पाठीवर सर्वात अधिक वेळा उच्चारला जाणारा महान शब्द झाला आहे. शोषणाविहीन मानवी जीवनाच्या निर्मितीसाठी आता 'जयभीम' हा पासवर्ड झालेला आहे आणि मानवी हक्कांसाठी संग्रामदीक्षा देत तो दुनियेत दुमदुमतो आहे. म्हणूनच यशवंत मनोहर यांनी ही महाकविता लाडक्या लेकराप्रमाणे संपूर्ण विश्वालाच उराशी कवटाळणाऱ्या बाबासाहेबांच्या आर्तस्वी महाप्रज्ञेला एकशेपंचविसाव्या जयंतीच्या निमित्ताने सादर अर्पण केलेली आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येकच शब्दावर जगातल्या सर्वच माणसांची नावे सन्मानाने छापली आहेत आणि बाबासाहेबांच्या सर्वच शब्दांचे भाषांतर मनोहरांनी 'बाबासाहेब...!' या एकाच सूर्यशब्दात केलेले आहे आणि हे भाषांतर वाचकांना माणुसकीच्या परमशिखरावर घेऊन जाईल.
  • ही महाकविता आज संविधानविरोधात, समताविरोधात आणि सेक्युलॅरिझम - विरोधात कारवाया करणाऱ्या ब्राहमणी आणि भांडवली शक्तीविरुद्धचेही बाबासाहेबांना अभिप्रेत प्रखर भाष्य मांडते.

99.00

1 in stock