No products in the cart.
गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा
₹1,000.00 Original price was: ₹1,000.00.₹899.00Current price is: ₹899.00.
Out of stock
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Add to Wishlist
Description
- Language: मराठी
- Pages: 808
- Binding: Hardbound
- Weight :
- महात्मा गांधी आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन जननायकांमध्ये नेहमीच एक राजकीय कटुता पोकळी करून राहीलेली दिसते, सोबतच त्यांच्या अनुयायी म्हणवणाऱ्या लोकांमध्येही चढाओढीची चुरस दिसून येते. त्यामुळे या विषयांचा थेट प्रभाव जनमानस व राजकारणावर देखील पडलेला दिसून येतो. सध्या अनेक सांस्कृतिक राष्ट्रवादी शक्तींकडून गांधींचा विचार संपवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय व नथूरामसारख्या नराधमाला देवत्व बहाल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रयत्नात डॉ. आंबेडकरांनी गांधींवर केलेल्या टिकांचा वापर एका शस्त्रासारखा करण्यात येतोय हे सारासार विवेकबुद्धी असणाऱ्यांना त्वरित लक्षात येण्यासारखं आहे. यांत बामसेफसारखी संघटना या गोष्टींना खतपाणी पुरवते हे सांगायला नकोच! याच विरोधी विचाराला भेदण्याचा एक यशस्वी असा प्रयत्न माननीय रावसाहेब कसबे यांनी या ग्रंथांत विवेकवादी आणि चिकीत्सक भुमिकेतून केलेला आहे. रावसाहेब कसबे यांनी यां 800 पानी महाग्रंथाचे विभाजन तीन विभागांत केलेलं आहे.
- पहिला विभाग “सत्यशोधक राजकारणी” असा असून यांत गांधीपूर्व भारताची सामाजिक व राजकीय स्थितीचा आढावा, गांधींच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षाचं वर्णन, वेळप्रसंगी सफाई कामगार होण्याची तयारी ते एक भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व सहजपणे आपल्या खांद्यावर तोलणाऱ्या महानेत्याची सुरुवात हे सर्व सामावेलेलं आहे. दुसरा आणि सर्वात महत्वाचा विभाग “गांधी आणि आंबेडकर” हा आहे. हा विभाग आजवर गांधी आणि आंबेडकर समन्वायवर आधारित असलेल्या अनेक पुस्तकांना पुरून उरेल असाच आहे. गांधी-आंबेडकरांची प्रथम भेट व त्यात उडालेले खटके ते गोलमेज परिषदेत आंबेडकरांनी गांधींवर केलेली मात आणि स्वतंत्र मतदारसंघाची मागणी या विरोधात गांधींनी धरलेलं उपोषण या दरम्यान या दिग्गजांमध्ये जेवढ्या गाठीभेटी आणि घटनांच्या उलाढाली झाल्या त्यांचा संपूर्ण तपशील जनता, बहिष्कृत भारत, यंग इंडियासारख्या वृत्तपत्रांचा संदर्भ देऊन करण्यात आला आहे. सोबतच डॉ. आंबेडकरांनी अनेकवेळा गांधींच्या सनातनी वृत्तीवर जे प्रखर प्रहार केले त्यातून गांधींमध्ये झालेला बदल हे सर्व लेखक डोळे दिपून जातील या पद्धतीने मांडतो. स्वतःला कट्टर गांधीवादी व आंबेडकरवादी म्हणवणाऱ्या लोकांनी हे आवर्जून लक्षात घेण्यासारखे आहे. तिसरा विभाग “रक्तज्वालात अंतहीन प्रवास” असा आहे. या विभागात स्त्रियांना कसं गांधी स्वातंत्र्य संग्रामात सहभागी करतात व त्यांना देशी माल तयार करण्यासाठी चरख्याचे प्रशिक्षण देणे हे सर्व यात वर्णिले आहे. म्युरीएल लेस्टरसारख्या मोठ्या स्त्रियांचा देखील गांधी-आंबेडकर यांत समन्वय घडवण्यात कसा सहभाग होता हे यात पहायला मिळते. पुढे याच विभागांत सर्वात चर्चिला जाणारा मुद्दा तो ब्रम्हचर्याचा. या विषयावर देखील कसबेंनी निर्भिडपणे मोठमोठ्या मनोविश्लेकांचं आणि अध्यात्मिक गुरूंच्या वचनांचे दाखले देऊन चिकीत्सक वर्णन केलं आहे. त्यामुळे हा ग्रंथ गांधींवर आजवर लिहील्या गेल्या लाखों ग्रंथात आपलं वेगळं व वजनदार स्थान निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. ज्यांच्या मनात गांधी आणि आंबेडकर या दोन व्यक्तीत्वांविषयी संभ्रम अथवा कटुता असेल त्यांनी ग्रंथ नक्की वाचावा. महात्मा गांधी यांच्यावरील अन्य चरित्रांपेक्षा वेगळा दृष्टिकोन देणारा ग्रंथ ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी लिहिलेला आहे.
- – राज जाधव
Reviews
There are no reviews yet.